Friday, 5 June 2015

वट पौर्णिमा

उद्या वट पौर्णिमा …. सगळ्या बायका वडाला धरणार उद्या … अगदी दोरे गुंडाळुन गुंडाळून जीव नकोस होणार त्या वडाचा … झाडांपासून प्राणवायू मिळतो … पण इतके दोरे बांधले तर तो वड प्राणवायू देणार तरी कसा… चेष्टेचा भाग सोडला तर वट पौर्णिमा का करावी , कशाला करावी? , नाही केली तर काय होईल? , नाही नाही हि रीत आहे काहीही करून पाळलीच पाहिजे अस म्हणुन ओढुन ताणुन ती पाळावी का? नाही केली पुजा, नाही केला उपास किंवा नवऱ्यालाच पाठवले वडावर दोरे बांधायला तर ? या सगळ्या प्रश्नांचा पुनर्विचार करावा असे वाटते
माझ्या observation प्रमाणे १००% पैकी जवळ जवळ ७० ते ८० % … मी तर म्हणेन ९५% ( पण ९५% म्हणणे जर अतीच वाटते म्हणून ७० ते ८०%) बायका फक्त रीत म्हणुन , सासूबाई , आई सांगते म्हणून , अरे पूजा नाही केली तर लोक काय म्हणतील म्हणून , वट पौणिमा साजरी करतात … खरच ती साजरी करायची त्यांची मानसिकता असते का हो …. ? आपल्या आजूबाजूला बऱ्याच घटना घडत असतात , परवाच काही दृश्य बघीतली मी अगदी लागोपाठ कदाचित त्या दृश्यामुळेच मला हे लिहावेसे वाटतंय … असो तर
दृश्य क्रमांक १)
एक नवर्याने बायकोला अगदी वेठीस धरले होते । " अग नीट चाल ना जरा , त्या माणसाचा धक्का लागला तुला तर ! तो पदर जरा नीट घे , आजुबाजूची माणस बघत असतात तुला समजत नाही का ! अश्या आणि बऱ्याच सुचना तो करत होता. संशयाने बघत होता तिच्या हलचालींकडे … बिचारी ती बायको अगदी भांडावून गेली होती …. असा जर रोज होत असेल तर ती कोणत्या मानसिकतेने वट पौर्णिमा साजरी करत असेल ?
दृश्य क्रमांक २)
नवरा दारू पिऊन टल्ली होता … अजून दारू हवी म्हणून बायको कडे पैसे मागत होता … आणि तिने नाही म्हणताच दिल्या दोन लगावुन तिला . बिचारी इतक्या जोराच्या माराने ती खाल्ती पडली बरोबर असलेला छोटा मुलगाही पडला. दारुड्या नवरा आणि त्याची पोर असा संसार ती बिचारी काबाडकष्ट करून रेटत असेल आणि त्यातून असा मार सुद्धा खात असेल तर ७ जन्म असा नवरा मिळावा म्हणण्याची तिची मानसिकता तरी असेल का?
दृश्य क्रमांक ३)
एक इंग्रजाळलेली मराठी बाई , नवर्यासोबत बहुदा पहिल्यांदाच वट पौर्णिमेच्या पूजेचे साहित्य कागदावर लिहून आणल्याप्रमाणे खरेदी करायला बाजारात आली होती … किती outdated हे सगळा असा त्रासिक चेहरा करत … "अरे येड्या ती पिशवी जरा नीट धर ना" असं म्हणत आणि नवऱ्याचा पाणउतारा करायची एकही संधी न सोडता madam एकदाच्या खरेदी करून घरी रवाना झाल्या . इथे त्या बाईची मानसिकता काय असेल वट पौर्णिमेच्या पूजे प्रती। असा जे बोलेल ते ऐकणारा नवरा तिला ७ जन्म मिळाला तर तिची काहीच हरकत नसावी . मला वाटते इथे त्या बाई पेक्षा त्या बिचार्या नवर्याची मानसिकता तपासून बघायला हवी . अशी बायको ७ जन्म नको रे देवा ! असाच म्हणत असेल तो मनात .
वरील प्रसंग अगदीच नेहमी आपल्या आजूबाजूला घडणारे आहेत या व्यतिरीक्त सुद्धा काही वेगळे प्रसंग घडत असतील आजूबाजूला …हे प्रसंग पाहून त्या सावित्रीला वाटत असेल कुठून मी सत्यवानाला वाचवले आणि हि प्रथा पडली …
आपण थोडा वेगळा विचार करूया का या निम्मित्ताने … वट पौर्णिमेची पूजा करावी, उपास करावा हि पूर्वापार चालत आलेली रीत आहे। नवऱ्यासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, निरोगी आयुष्यासाठी बायकोने करावायचे हे व्रत आहे. ७ जन्म किंवा जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा म्हणून बायका हे व्रत करतात … पण काळानुरूप आजकाल सगळच बदलतंय तर अगदी ७ जन्म किंवा जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा असा म्हणण्यापेक्षा या जन्मात नवरा सुखी राहू दे , आमचा संसार सुखाचा होऊ दे , अशी मनापासून वडा समोर प्रार्थना करून व्रत करायला काय हरकत आहे … ७ जन्म खूप होतात हो …. मिळालेला जन्म आम्ही एकमेकांशी नीट वागु, बोलू, सुखाने नांदू असा विचार सगळ्या नवर्यानी आणि हे व्रत बायकांचे असते म्हणून बायकांनी केला तर काहीतरी चांगला निष्पन्न होईल असे वाटते… अश्या प्रकारच्या विचारांनी कदाचित समाजाच्या ढासळत चाललेल्या तोलला सांभाळायला मदत होईल. आणि कशाला हवी एकच बायको आणि एकच नवरा ७ जन्म … variety हवीच कि आयुष्यात ! हा आता हि variety प्रत्येक जन्मानुरूप बदलावी . एकाच जन्मात भरपूर variety हवी असे मला अजिबात म्हणायचे नाही …
विदुला दातार

No comments:

Post a Comment