बाबा आमटे यांच्या प्रकल्पांना भेट द्यायला मिळाली
त्या भेटी नंतरचे हे चार शब्द
एखाद्या गोष्टीचा ध्यास
घेणे, जीव तोडून
ती गोष्ट पूर्ण
करणे, त्या साठी
सर्वस्व झोकून देणे
अश्या गोष्टी करणारी
माणसे वेडीच म्हणायला
हवी.
असाच एक
वेडा माणुस "बाबा
आमटे " घरच्या श्रीमंतीचा पुरेपूर उपभोग
घेतलेला, निडर, बेफाम, मनात
येईल ते करणारा
, अतिशय हुशार , करारी असा
हा माणुस एक
दिवस नखशिखांत हादरतो
तो एका बिचाऱ्या
कुष्ठरोगी माणसाच्या विव्हळण्याने , कधीही
भीती माहित नसलेला
हा माणूस अस्वस्थ
होतो, हि अस्वस्थता
घालवुन टाकायची त्याची धडपड
चालु असते , त्यासाठी
काय करता येईल याचा
दिवस रात्र विचार
चालू असतो
या अस्वस्थतेतून एक अनोखे जग निर्माण
होते "आनंदवन
" नावाचे. या वनात
हजारो कुष्ठरोगी आनंदाने
नांदत आहेत. लोकांच्या
सहनभूतीपुर्वक नजरा नाकारून
स्वबळावर उभे असणारे
कुष्ठरोगी पहिले कि स्वताच्या
दुःख कुरवाळत बसण्याच्या
वृत्तीची चीड येते. कुष्ठरोग्यांसाठी
स्वताचे संपुर्ण आयुष्य वेचणार्या
बाबांचे पाय ज्या
भूमीला लागले त्या पुण्यभूमीत
मला जायला मिळाले
हे मी माझे
भाग्य समजते.
बाबा आमटे
आणि त्यांचे सहकारी,
त्यांची पत्नी साधनाताई आणि
त्यांची मुले डॉक्टर
विकास आमटे आणि
डॉक्टर प्रकाश आमटे या सर्वांच्या
प्रयत्नातून फुललेले हे आनंदवन
आज यशस्वी पणे
मार्गक्रमणा करत आहे
. बाबांनी चालु केलेले
हे कार्य आज
त्यांचे सुपुत्र डॉक्टर विकास
आमटे आणि
त्यांच्या पत्नी भारती ताई
आमटे समर्थपणे
पेलत आहेत. १९४९
साली बाबांनी महारोगी
सेवा समितीची स्थापना
केली. या समिती
द्वारे आनंदवनात अनेक प्रकल्प यशस्वी पणे
सुरु आहेत. विकास
आमटे म्हणतात कि
आनंदवन हे बाबांचे
नसून , आमचे कोणाचे
नसून हे कुष्ठरोग्यांचे
आहे, ते आहेत
म्हणून आम्ही आहोत. विकास
भाऊ नी स्वःताहा इथल्या प्रत्येक
प्रकल्पात काम केलेले
आहे. त्यामुळे कुठल्याही
कामात अडचण आली
कि ती ते
चुटकीसरशी सोडवु शकतात. गर्वाचा
कुठलाही लवलेश इथे नाही.
नावाप्रमाणेच या कार्याचा
विकास घडवण्याचे काम
ते आज मनापासून
करत आहेत. कुष्ठरोग हा महारोग
म्हणवला जातो मात्र
हा एकमेव रोग
आहे जो १००%
बरा होतो. या
मधे हाताची बोटं
झडतात , शरीरावर ज्या ठिकाणी
हा रोग होतो
त्या ठिकाणच्या संवेदना
कायमच्या नाहीश्या होतात पण
बोटं झडलेले हेच हाथ
जेव्हा सुंदर भेटकार्ड बनवतात
, सतरंज्या, स्वेटर विणतात, शिल्प
बनवतात , ट्रायसिकल बनवतात , चाळण्या
पिशव्या बनवतात , गृहउपयोगी वस्तु
बनवतात तेव्हा थक्क व्हायला
होते. या माणसांसमोर
आपण अधु आहोत
असे वाटते . इच्छा
असली कि मार्ग
मिळतो याचे ज्वलंत
उदाहरण इथली माणसे
बघितली कि मिळते.
तिथे असलेल्या अभयारण्यात
फिरताना भारावल्यासारखे होते .
खूप मोठा परिसर
असलेल्या ह्या आनंदवनात
एक समाधान आहे
कर्तव्यपूर्तीचे , दुसर्याला
आनंद दिल्याचे, समाजाचे
देणे दिल्याचे. इथे
फक्त कुष्ठरोगी आहेत
असे नाही तर
अंध , निराधार माणसे,
परित्यक्त्या स्त्रिया सुद्धा इथे
निर्भय पणे राहतात.
निर्वाज्य प्रेम इतकीच माफक
अपेक्षा इथल्या लोकांची आहे.
महारोगी सेवा समिती या समिती द्वारे बरे झालेल्या
कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन सुद्धा केले जाते. त्यासाठी सोमनाथ या प्रकल्पाची निर्मिती
करण्यात आली आहे इथे कुष्ठरोग्यांच्या वसाहती पाहायला मिळतात. त्यांच्या मदतीने इथे
कोबी वांगी अश्या भाज्या पिकवल्या जातात, धरण बांधाली जातात. इथे एक वेगळ्या प्रकारचा
बंधारा बघायला मिळतो. टायरचा बंधारा. हा बंधारा टायर,सिमेंट,काचा यांच्या मिश्रणाने
बनवला जातो. हा अनोखा बंधारा , इथल्या पाण्याचे नियोजन, इथल्या जमिनीचे वैशिष्ठ ओळखुन तिचा योग्य वापर हे सर्व पाहून विकास
भाऊंच्या कल्पकतेला दाद द्यावीशी वाटते.
बाबांच्या सोमनाथ या दूरदृष्टीला विकास भाऊंनी
योग्य न्याय दिला आहे तर दुसरीकडे बाबांचे दुसरे सुपुत्र डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या
पत्नी मंदा ताई आमटे हेमलकसा इथे एका अद्वितीय
कार्यात मग्न आहे. माडिया, गोंद या मागासलेल्या आणि जगापासुन दूर असलेल्या आदिवासी जमातींना माणसात आणून त्याच्या आयुष्यात प्रकाशज्योत
पेटवण्याचे काम प्रकाश भाऊंनी सार्थ पणे केले आहे. प्रकाश भाऊ हेमलकसाच्या घनघोर अरण्यात
, नक्षल वाद्यांच्या राज्यात जगाशी संपर्क नसलेल्या आदिवासींना माणसात आणून मगसेसे पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
विकास भाऊंनी नावाप्रमाणे आनंदवनाचा विकास घडवला
तर प्रकाश भाऊंनी आदिवासींना प्रकाश वाट दाखवली.
बाबांच्या माणुसकीच्या व्रताला जोपासत ते पुढे नेण्याचे काम आज त्यांची हि दोन्ही
मुल करत आहेत आणि त्यांना त्यांच्या पुढच्या पिढीचीही साथ तेवढीच लाभत आहे या सारखे
दुसरे भाग्य अजून कुठले असेल
कुठल्याही
मदतीची अपेक्षा न ठेवता
सुरु झालेल्या या
अमोघ कार्याला हजारो
हाथ लाभले आहेत
बाबांवरच्या निस्सीम प्रेमापोटी अनेक
माणस, कार्यकर्ते इथे
मदतीला उभे आहेत.
पु ल देशपांडे
, दलाई लामा , जे आर
डी टाटा , नाना
पाटेकर यासारखे
अनेक थोर माणसं
इथे येउन भारावून
गेली आणि मदतीला
धावुन आली याच हजारो
हातांसोबत जर सरकारी
हातांची साथ या
प्रकल्पाला मिळाली तर सोन्याहुन
पिवळे. कुठलीही अडचण आली
कितीही संकटे आली तरी
थांबायचा नाही त्यावर
मात करत पुढे
चालायचे हा वसाच
जणु इथल्या लोकांनी
घेतलेला आहे माणुसकी
या शब्दाचा अर्थ
बाबांचे हे आनंदवन
बघून कळतो.
काय गरज
होती ऐशोआरामाचे आयुष्य
सोडून समाजसेवा करण्याची
अश्या कोत्या मनाच्या
विचार करणाऱ्या माणसांना
बाबांनी दाखवून दिले कि
मिळालेले आयुष्य कसे अर्थपूर्ण
जगावे. यात त्यांना
साथ लाभली त्यांची
पत्नी साधना
ताई यांची. प्रत्येक
यशस्वी पुरुष्याच्या मागे एक
स्त्री असते याचे
मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साधना
ताई. बाबांच्या या
वेडाला जपण्याचे काम त्यांनी
केले . अशा या साध्वीला
माझा नमस्कार
आनंदवनाचा पाया बाबांनी
घालुन दिला त्यावर
इमारत उभारायचे काम
अव्याहत पणे चालु
आहे . गरज आहे
ती प्रेमाची, मायेच्या
स्पर्श्याची, आणि हजारो
हातांची
तिथून आल्यापासुन मन
सुन्न होते. खरच
इतक वाईट असते
का जग कि
आपल्या जिवलगांना झालेल्या रोगामुळे
त्यांना झिडकारून देणारे. प्रेम या
शब्दाची गरज प्रत्येकाला
भासत असते . तेच
प्रेम त्या माणसांना
का मिळु नये.
कुष्ठरोग्यांच्या इस्पितळात फिरताना,तिथले
रोगी बघताना वेदना या शब्दाचा अर्थ कळतो. तिथल्या आजींचा हाथ हातात घेतल्यावर त्यांच्या
चेहऱ्यावरचे फुटलेले हसु बरेच काही सांगुन जाते. यातून सुखरूप बाहेर पडलेल्या
लोकांना त्यांच्या जीवाभावांच्या जगात
प्रवेश मिळत नाही
हे वास्तव मनावर
कोरल गेले . आणि
अश्या माणसांना प्रेमाचा
हाथ देऊ केलेले
बाबा आमटे पहिले
कि त्यांच्यासमोर नतमस्तक
झाल्याशिवाय राहु शकत
नाही
तो आला
त्याने पहिले आणि त्याने
जिंकले या उक्तीला
पुरेपूर जागलेल्या बाबा आमटे
यांच्या कार्याला प्रणाम करून
म्हणावेसे वाटते
निघाला तो दुर
देशी
हाक ऐकुनी
पामरांची
द्यावयास हात मदतीचा
हा ध्यास
पूर्णत्वाचा
दारूण सत्य समोर
आले
हळहळला जीव कोवळा
सरसावून उठला बेफाम
सुटला
हा ध्यास
पूर्णत्वाचा
घेतले हजारो हाथ
हातात
गुंतले हृदय एकमेकात
श्वास चाले या
जीवांचा
हा ध्यास
पूर्णत्वाचा
यशस्वी चाले हि
गाथा
लाभला विश्वास जिवलगांचा
संपला शोध अस्मितेचा
हा ध्यास
पूर्णत्वाचा